0 ची ओळख व लेखन

प्रस्तावना 0 ची ओळख व लेखन

views

4:19
0 ची ओळख व लेखन: शि: आज आपण 0 ह्या अंकाची ओळख व लेखन शिकणार आहोत. हे पहा मी टेबलावर काही गोल काढले आहेत आणि प्रत्येक गोलात काही वस्तू ठेवल्या आहेत. एकेकाने या वस्तू मोजून मला सांगा किती आहेत त्या? वि: १,२. बाई, या गोलात दोन खडू आहेत. शि: बरोबर! वि: १,२,३,४.५. बाई या गोलात ५ वह्या आहेत. वि: १,२,३,४,५,६,७. बाई या गोलात ७ फुले आहेत. वि: या गोलात ४ बांगड्या आहेत. वि: या गोलात ३ पेन आहेत. वि: या गोलात ९ फुले आहेत. वि: बाई या गोलात ६ खोडरबर आहेत. वि: आणि बाई या गोलात ८ फुले आहेत. वि: बाई पण या गोलात तर कोणतीच वस्तू नाही. हा गोल रिकामा आहे. शि: अगदी बरोबर! म्हणजे १ ते ९ अंकांची तुमची पूर्ण उजळणी झाली आहे. म्हणून तुम्हाला सर्व गोलांतील वस्तू ओळखता आल्या. पण या शेवटच्या गोलात काहीच नाही. आणि काहीच नाही म्हणजेच शून्य असतो. उदा: माझ्याकडे तीन चॉकलेटं आहेत ती तीनही चॉकलेटं मी राजूला दिली तर माझ्याकडे किती चॉकलेटं राहतील? वि: बाई, तुम्ही जर राजूला सगळी चॉकलेटं दिलीत तर तुमच्याकडे काहीच राहणार नाही. शि: अगदी बरोबर, माझ्याकडे काहीच नाही म्हणजेच शून्य चॉकलेटं राहतील. कळलं? वि: हो बाई, काहीच नाही म्हणजे शून्य. पण बाई, शून्य अंकांत कसे लिहितात? शि: मुलांनो, शून्य हा अंकात ‘‘0’’ असा लिहितात.