दशक उडी

प्रस्तावना दशक उडी

views

2:57
दशक उडी: शि: मुलांनो, आपण आतापर्यंत एकक आणि दशकाची ओळख करून घेतली आहे. आता आपण दशक उडी म्हणजे काय ते समजून घेऊ. आपण पाहिले की, १० या अंकात १ हा दशक आहे, आणि ० हा एकक आहे. म्हणजेच डावीकडील संख्या ही दशक असते. आणि उजवीकडील संख्या ही एकक असते. जर आपण माचीसच्या १० -१० काड्यांची २ बंडले घेतली तर ते होतील २ दशक. इथे सुट्टे काहीच नाहीत. म्हणून होतील शून्य एकक. म्हणून याचे लेखन करताना आपण डावीकडे, म्हणजे दशकाच्या घरात लिहू २ आणि उजवीकडे, म्हणजे एककाच्या घरात लिहू शून्य. पाहिलंत यामध्ये संख्या १० च्या पटीत वाढली. १० मध्ये १० मिळवले झाले २०. म्हणजेच झाले २ दशक. म्हणून याला आपण म्हणू दशकाची उडी. अशाचप्रकारे आपण पुढील संख्या तयार करू. इथे आहेत १० ची ३ बंडले म्हणजे ३ दशक. याला म्हणतात तीस. तीसाचे लेखन ३० असे करतात. इथे आहेत १० ची ४ बंडले म्हणजे ४ दशक. याला म्हणतात चाळीस. चाळीसाचे लेखन ४० असे करतात. इथे आहेत १० ची ५ बंडले म्हणजे ५ दशक. याला म्हणतात पन्नास. पन्नासचे लेखन ५० असे करतात. शि: तर मुलांनो या सर्व उदाहरणातून तुम्हाला दशकउडी समजली असेलच.