शतकाची ओळख

प्रस्तावना शतकाची ओळख

views

1:38
शतकाची ओळख: मुलांनो, आपण १ ते ९९ पर्यंतचे सर्व आकडे शिकलो आहोत. आपण एकक आणि दशकाची ओळख करून घेतली आहे. आता आपण शतकाची ओळख करून घेणार आहोत. पाहा मुलांनो, ९९ + १ किती होतात ते कसे लिहायचे? तर, ९९ + १ होतात १०० शंभर. ते असेही लिहू शकतो: ९९ = ९ दशक + ९ एकक + १ एकक. मुलांनो, आपल्याकडे नऊ पेक्षा मोठा अंक नाही. ९ मध्ये १ एकक मिळवले की झाले १०. म्हणजे एककाच्या घरात १० झाले, त्यांचा एक गठ्ठा झाला. तो डावीकडच्या दशकाच्या घरात नेऊ. ९ + १ दशक = १० दशक आता दशकाच्या घरात दहा दशक झाले. दहा दशकांचा मोठा गठ्ठा बांधून डावीकडे शतकाच्या घरात ठेवू, या मोठ्या गठ्ठ्याचे नाव ‘शतक’.’शतक’ म्हणजे शंभर. मुलांनो, शतकात १ शतक, 0 दशक आणि 0 एकक आहे म्हणून शंभर हे १०० असे लिहिले जाते.