आत - बाहेर आणि रुंद - अरुंद Go Back प्रस्तावना आत - बाहेर आणि रुंद - अरुंद views 4:25 आत बाहेर आणि रुंद अरुंद: शि: मुलांनो, पाहा: याठिकाणी टेबलावर तुम्हाला काय दिसतंय ? वि: सर, टेबलावर पेन्सिल आणि एका वाटीत चॉकलेटं आहेत. शि: अगदी बरोबर, या वाटीत चॉकलेटं आहेत. म्हणजेच ती चॉकलेटं या वाटीच्या आत आहेत. आणि टेबलावर फक्त ही पेन्सिल आहे, म्हणजे पेन्सिल वाटीच्या बाहेर आहे. शि: आता मी तुम्हाला काही वस्तू दाखवतो. ही पाहा एक पाण्याची बाटली आणि एक ग्लास. बाटलीचे तोंड कसे आहे? वि: सर, ते अरुंद आहे. शि: आणि ग्लासचे. वि: ते तर रुंद आहे. शि: आता ही वाटी पाहा आणि हे पातेले पाहा. यात काय रुंद आहे आणि काय अरुंद आहे? वि: सर, वाटी अरुंद आहे तर पातेले रुंद आहे. सोप्पं आहे अगदी. शि: आपण रोज दिवसभरात अनेकदा आत बाहेर, रुंद-अरुंद असे शब्द वापरत असतो. समजा तुम्हांला या बाटलीत धान्य भरायचे आहे, तर ते पटकन भरता येईल का? वि: नाही सर, वेळ लागेल. कारण बाटलीचे तोंड अरुंद आहे. शि: आणि ग्लासमध्ये? वि: ते पटकन भरून होईल. शि: छान! म्हणजे आता रुंद-अरुंद म्हणजे काय ते नीट कळले आहे. हो ना? वि: हो, सर. प्रस्तावना आत - बाहेर आणि रुंद - अरुंद