आकार ओळख

प्रस्तावना आकार ओळख

views

3:41
आकार ओळख. शि: मुलांनो, आज आपण काही आकारांची ओळख करून घेणार आहोत. मुलांनो, मला सांगा तुम्ही लॉलीपॉप खाता का? वि: हो, बाई नेहमीच खातो. शि: बर मग लॉलीपॉपच्या वरच्या गोळीचा आकार कसा असतो? वि: गोल. शि: बरोबर, सूर्याचा आकार कसा असतो? वि: गोल. शि: छान! आता मला सांगा तुम्हाला सगळ्यांना समोसा आवडतो का? वि: हो बाई, शि: त्या समोशाचा आकार कसा असतो ? वि: बाई, समोशासचा आकार त्रिकोणी असतो. शि: बरोबर, तुमच्या हातात जी पाटी आहे तिचा आकार कसा आहे? वि: बाई, पाटीचा आकार चौकोनी आहे. शि: आता मला वर्गातील चौकोनी आकाराच्या गोष्टी सांगा पाहू. वि: बाई, वही, फळा, दरवाजा, कंपासपेटी. माझा लंचबॉक्स. डस्टर. शि: बरोबर! आता गोल काही आहे का पाहा वर्गात? वि: बाई, माझा डबा गोल आहे. पंख्याचा मधला भाग गोल आहे. पण दुसरे काही गोल दिसत नाही. शि: अगदी बरोबर! आणि त्रिकोणी काही आहे का? वि: नाही बाई, आम्हाला तरी दिसत नाही. शि: बरोबर आहे तुमचे! तुम्हांला आकार छानच समजले आहेत.