सर्वात लांब – सर्वात आखूड Go Back प्रस्तावना सर्वात लांब – सर्वात आखूड views 3:05 सर्वात लांब – सर्वात आखूड: शि: मुलांनो, या आधीच्या पाठात आपण लांब आणि आखुड म्हणजे काय ते शिकलो. तर आज आपण सर्वात लांब आणि सर्वात आखूड म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. हे चित्र पहा याठिकाणी एक मोठा टेम्पो दिला आहे. आणि सोबत दोन कार दिल्या आहेत. त्यातील एक लहान आणि दुसरी अगदीच लहान आहे. म्हणजेच सर्वात लांब असणारा टेम्पो आहे आणि सर्वात लहान असणारी आखूड कार दाखवली आहे. यावरून तुम्हाला या सर्वात लांब आणि सर्वात आखूड कसे ओळखायचे ते समजले असेलच. मग सांगा रेल्वे, बस आणि रिक्षा या वाहनांत सर्वात लांब आणि सर्वात आखूड काय असेल? वि: बाई या वाहनांत सर्वात लांब रेल्वे असेल आणि सर्वात आखूड रिक्षा असेल. कारण ती बसपेक्षाही लहान असते. शि: अगदी बरोबर! आता हे चित्र पहा, यात ३ अळ्या दिल्या आहेत. अळी क्रमांक १, अळी क्रमांक २ आणि अळी क्रमांक ३. यातील सर्वात लांब अळीखाली असलेल्या चौकटीत रंग कोण भरेल? वि: बाई, या चित्रांत ३ क्रमांकाची अळी सर्वात मोठी आहे. म्हणून मी त्याखालील चौकट रंगवतो. शि: शाब्बास! आता या चित्रात पहा, याठिकाणी ३ वेगवेगळ्या प्रकारच्या रांगा दिल्या आहेत पहिल्या रांगेत ७ माणसे उभी आहेत. दुसऱ्या रांगेत ५ माणसे उभी आहेत आणि तिसऱ्या रांगेत ३ माणसे उभी आहेत. मग यातील सर्वात आखूड रांग कोणती आहे? त्या रांगेजवळील चौकट रंगवा. कोण रंगवेल? वि: बाई, या चित्रात ३ क्रमांकाची रांग सर्वात आखूड आहे म्हणून मी त्या रांगेजवळील चौकट रंगवली. प्रस्तावना सर्वात लांब – सर्वात आखूड