उंच – ठेंगणा

प्रस्तावना उंच – ठेंगणा

views

3:06
उंच – ठेंगणा: शि: आज आपण उंच आणि ठेंगणा यातील फरक समजून घेणार आहोत. पहा, माझ्या हातात दोन खडू आहेत. सांगा पाहू, यातील लहान आणि मोठा खडू कोणता आहे? वि: बाई, उजव्या हातातला खडू लहान आहे आणि डाव्या हातातला खडू मोठा आहे. शि: अगदी बरोबर! म्हणजेच उंचीला मोठा म्हणजे उंच आणि उंचीला लहान म्हणजे ठेंगणा असे आपण म्हणू शकतो. हे पहा, इथे राज आणि सूरज उभे आहेत. या दोघांमध्ये उंच कोण आहे आणि ठेंगणा कोण आहे.वि: बाई, राज उंच आहे आणि सुरज ठेंगणा आहे. शि: अगदी बरोबर. या दोघांच्या उंचीमधला फरक आता तुम्हाला कळला असेलच. तर मग आता ही चित्र पाहा. याठिकाणी दोन कपाटं दिली आहेत तर यामध्ये जे उंच कपाट आहे त्याखालील चौकट रंगवून दाखवा. वि: बाई, डाव्या बाजूचे कपाट उंच आहे म्हणून त्याखालील चौकट मी रंगवते. शि: अगदी बरोबर उत्तरे दिलीत सर्वांनी! म्हणजे आता तुम्हाला उंच आणि ठेंगणा यातील फरक चांगला कळला आहे.