डावा - उजवा Go Back प्रस्तावना डावा - उजवा views 2:39 डावा - उजवा: शि: मुलांनो, तुम्ही नेहमी ऐकत असालना डावा हात, उजवा हात? तुमच्या घरी तुम्ही लहान असताना आई सांगायची की नाही, उजव्या हाताने जेवायचे. उजव्या हाताने लिहायचे. तर आज आपण याच डाव्या आणि उजव्याची माहिती घेणार आहोत. मुलांनो, हा आहे माझा उजवा हात. पहा माझ्या उजव्या बाजूला राणी उभी आहे म्हणजे ही झाली माझी उजवी बाजू. आणि हा आहे माझा डावा हात. माझ्या डाव्या बाजूला सोहम उभा आहे म्हणजे ही झाली माझी डावी बाजू. शि: चला तर आता सगळ्यांनी तुमचा उजवा हात वर करा पाहू. वि: उजवा शि: शाब्बास! मग आता डावा हात वर करा पाहू. वि: डावा शि: छान! रोहन तुझ्या उजव्या हातात पुस्तक पकड. शि: छान! श्वेता माझ्या डाव्या हातावर पेन ठेव. शि: खूपच छान! सरोज रेश्माच्या उजव्या बाजूला उभी राहा. शि: अगदी बरोबर ! म्हणजे आता तुम्हाला उजवा डावा हे नीट समजले आहे. पण मुलांनो, जेव्हा आपण रस्त्यावरून जातो तेव्हा आपल्याला उजवा आणि डावा ओळखायचे असेल तर ते ओळखण्यासाठी रस्त्यावर बोर्डवर काही चिन्हं दिलेली असतात. त्यावरून आपण उजवी किंवा डावी बाजू ओळखू शकतो. प्रस्तावना डावा - उजवा