कमी वेळ - जास्त वेळ

प्रस्तावना कमी वेळ - जास्त वेळ

views

3:21
कमी वेळ - जास्त वेळ: शि: मुलांनो, आज आपण कमी वेळ आणि जास्त वेळ कसा ओळखायचा ते शिकणार आहोत. शाळेत आपल्याला एक जेवणाची सुट्टी मिळते आणि एक सुट्टी खेळाची मिळते. जेवणाची सुट्टी ही २० मिनिटांची असते आणि खेळाची सुट्टी ही १५ मिनिटांची असते. मग मला सांगा यातील कमी वेळ कोणत्या सुट्टीला असतो? वि: बाई खेळाच्या सुट्टीला कमी वेळ असतो. शि: बरोबर आणि मग कोणत्या सुट्टीला जास्त वेळ असतो? वि: जेवणाच्या सुट्टीला जास्त वेळ असतो. शि: अगदी बरोबर! म्हणजेच या उदाहरणावरून आपल्याला समजते की जेवणाची सुट्टी जास्त असते आणि खेळाची सुट्टी कमी असते. मग आता असेच आणखी एक उदाहरण पाहूया, पहा याठिकाणी डाव्या चित्रात नळाखाली बॉटलमध्ये पाणी भरताना दिसते आहे आणि उजव्या चित्रात नळाखाली ड्रममध्ये पाणी भरताना दिसते आहे. मग या दोघांमध्ये पाणी भरण्यासाठी ज्याला कमी वेळ लागेल, त्याखालील चौकट रंगवा. वि: बाई, बॉटलमध्ये पाणी भरायला कमी वेळ लागेल म्हणून मी पहिली चौकट रंगवली. शि: छान!