कशानंतर काय?

प्रस्तावना कशानंतर काय?

views

4:04
कशानंतर काय? शि: मुलांनो, आज आपण कशानंतर काय येते हे शिकणार आहोत. त्याआधी आपण आधी आणि नंतर म्हणजे काय ते समजून घेऊ या . मुलांनो, मला सांगा, आई चपाती बनवते तेव्हा ती आधी चपाती भाजते की लाटते? वि: आई आधी चपाती लाटते, त्यानंतर भाजते. लाटायच्या आधी भाजता कशी येईल? शि: बरोबर म्हणजे चपाती लाटणे आणि नंतर भाजणे यालाच आपण आधी काय केले ही पहिली कृती आणि नंतर काय केले ही दुसरी कृती असे म्हणू शकतो. किंवा कशानंतर काय असेही म्हणू शकतो. चला तर मग आता कशानंतर काय हे समजून घेऊ, मुलांनो, या चित्रात पाहा आता आपण या गोष्टींचा योग्य क्रम कसा लावायचा ते मी तुम्हाला सांगते. या पहिल्या चित्रात मुलाच्या हातात फळ आहे आणि तो ते फळ नळाखाली पाण्यात धुतो आहे. दुसऱ्या चित्रात तो फळ खातो आहे. आणि तिसऱ्या चित्रात तो फळ कापतो आहे. हा क्रम चुकीचा आहे. या चित्रांना योग्य क्रम लावायचा आहे. तो कसा लावायचा ते पहा, मुलांनो जेव्हा आपण एखादे फळ खायला घेतो तेव्हा ते प्रथम स्वच्छ धुतो, त्यानंतर ते कापतो आणि मग ते फळ खातो. म्हणून या चित्रात मुलगा फळ धुतो आहे त्याला आपण १ हा क्रमांक दिला. दुसऱ्या चित्रात तो फळ खातो आहे. तिसऱ्या चित्रात तो फळ कापतो आहे. आधी फळ कापायला हवे. म्हणून त्याला २ हा क्रमांक दिला. आणि फळ खातो त्या चित्राला ३ रा क्रमांक दिला.