सांख्यिकी

प्रस्तावना

views

5:16
मागील इयत्तेत आपण सांख्यिकीचा अभ्यास केला आहे. जसे की सरासरी काढणे, वारंवारता, ताळयाच्या खूणा इत्यादींचा अभ्यास केला आहे. इयत्ता आठवीत आपण सांख्यिकीचा पुढील भागाचा अभ्यास करणार आहोत. सरासरी काढताना आपण काय करतो? तर दिलेल्या सर्व प्राप्तांकांची बेरीज करून एकूण प्राप्तांकांच्या संख्येने भागतो. जे उत्तर मिळते ती सरासरी असते. आपण हे एका उदाहरणाच्या साहयाने समजून घेवूया.