सांख्यिकी

शतमान स्तंभालेख

views

3:24
आता आपण शतमान स्तंभालेख म्हणजे काय? किंवा तो कसा काढतात याविषयी जाणून घेवूया. हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. उदाहरण: आर्वी या गावामध्ये लावलेल्या 60 झाडांपैकी 42 झाडे जगली. आणि मोर्शी या गावामध्ये लावलेल्या 75 झाडांपैकी 45 झाडे जगली. बार्शी या गावात 90 झाडांपैकी 45 झाडे जगली. यांपैकी कोणत्या गावातील वृक्षारोपण अधिक यशस्वी झाले ते समजण्यासाठी केवळ ही संख्या पुरेशी नाही. त्यासाठी जगलेल्या झाडाचे शतमान म्हणजेच टक्केवारी काढावी लागेल. म्हणून आपण सर्व गावातील जगलेली झाडे व एकूण लावलेली झाडे यांची टक्केवारी काढू. आर्वी येथे जगलेल्या झाडांचे शेकडा प्रमाण =42/60 x 100 = 420/6 = 70 मोर्शी गावातील जगलेल्या झाडांचे शेकडा प्रमाण = 45/75 x 100 = 4500/75 = 60 बार्शी गावातील जगलेल्या झाडांचे शेकडा प्रमाण= 45/90 x 100 = 450/9 = 50 या शतमानावरून असे लक्षात येते की आर्वी गावातील जगलेल्या झाडांची संख्या कमी असली तरी त्याचे शतमान (टक्केवारी) जास्त आहे. म्हणजेच शतमानावरून वेगळया प्रकारची माहिती मिळते. मुलांनो दिलेली माहिती शतमानात रूपांतरित करून जो विभाजित स्तंभालेख काढतात त्याला शतमान स्तंभालेख असे म्हणतात. शतमान स्तंभालेख विभाजीत स्तंभालेखाचे विशेष रूप आहे. आता शतमान स्तंभालेख आलेख कागदावर कसा काढतात ते आपण पाहूया.