चला हाताळूया भौमितिक आकार

प्रस्तावना चला हाताळूया भौमितिक आकार

views

4:45
आज आपण भूमितीतील विविध आकार जाणून घेणार आहोत. त्यासाठी या वस्तू पाहा. इथे काडेपेटी, टूथ-पेस्टचे खोके, मिठाईचे खोके, पाण्याच्या बाटल्या, विविध आकारांचे चेंडू, विदूषकाची टोपी, कार्डपेपरची नळकांडी या सर्व वस्तू ठेवल्या आहेत. आता यामध्ये सारख्या आकाराच्या वस्तू कोणत्या आहेत त्या मला सांगाल का? काडेपेटी, मिठाईचे खोके, टूथपेस्टचे खोके हे सारख्या आकारांचे आहेत. लहान- मोठे चेंडू गोल आकाराचे आहेत. बाई विदुषकाची टोपी आणि कार्डपेपरची नळकांडी सारख्याच आकारांची दिसत आहेत. पण त्याला काय म्हणतात आम्हाला माहीत नाही. आणि पाण्याच्या बाटल्या पण एकसारख्याच उभ्या आहेत. मिठाईचे खोके, वीट या वस्तूंच्या आकाराला इष्टिकाचिती म्हणतात. कंपासपेटी, खोके, खोडरबर, काडेपेटी ही इष्टिकाचितीची उदाहरणे आहेत. ही पाहा वीट. या विटेला किती कडा आणि कोपरे आहेत ते आता आपण मोजू. इष्टिकाचितीला 12 कडा आहेत. ज्यात आईस्क्रिम भरून दिला जातो तो कोन तुम्ही पहिला असेलच. त्याचा आकार कसा असतो? तर वरील भागात गोलाकार आणि खाली निमुळता होत गेलेला असतो. तर या आईस्क्रिमच्या कोनसारख्या दिसणाऱ्या आकाराला शंकू म्हणतात. आईस्क्रिमचा कोन, मेहंदीचा कोन, विदूषकाची टोपी ही शंकूची उदाहरणे आहेत. ही पहा माझ्या हातात विदूषकाची टोपी आहे. तिचा आकार शंकूसारखा असून तिचा तळ वर्तुळाकार आहे. हिला केवळ एक कड आणि एकच कोपरा आहे. कोपरा आणि कडा यांच्यामधील हा जो उभा तिरका पृष्ठभाग आहे तो कसा वळत गेला आहे ते पहा. तो वळणारा पृष्ठभाग म्हणजेच वक्रपृष्ठभाग होय. मग आता मला सांगा, या टेबलावर विदूषकाची टोपी सोडून आणखी कोणती वस्तू शंकूच्या आकाराची आहे?