चला हाताळूया भौमितिक आकार

दंडगोल

views

3:59
तुम्ही स्वयंपाकघरातील डबे पाहिलेच असतील. असा वाटोळा तळ असलेल्या डब्यासारख्या आकाराला दंडगोल म्हणतात. पाण्याची बाटली, डबा या सर्व वस्तूंचे आकार दंडगोल किंवा वृत्तचितीचे असतात. ही पाहा, माझ्या हातात पाण्याची बाटली आहे. हिचा आकारही दंडगोल आहे. हिला दोन कडा आहेत. पण एकही कोपरा नाही. दंडगोलाचा वरचा आणि तळाचा पृष्ठभाग सपाट आणि वर्तुळाकार असतो. मधला भाग वळलेला असतो. म्हणजेच वरची आणि तळाची कडा यामधला पृष्ठभाग हा वक्रपृष्ठभाग असतो. तुम्ही जर घसरगुंडीवर दंडगोल आकाराची कोणतीही वस्तू आडवी म्हणजे अशी ठेवल्यास तुम्हांला दिसेल की, ती वस्तू घसरगुंडीवरून घरंगळते. मात्र तीच वस्तू जर उभी म्हणजे सपाट बाजूने ठेवली तर ती वस्तू घसरगुंडीवरून घसरत जाईल.