चला हाताळूया भौमितिक आकार

कडा व कोपरे मोजा

views

3:26
या काही वस्तू आहेत. तुम्ही या प्रत्येक वस्तूचा आकार कोणता आहे आणि या वस्तूला किती कडा व किती कोपरे आहेत ते सांगा. त्यावरून आपण हा तक्ता पूर्ण करू. शि: हा आहे टूथपेस्टचा खोका. मग सांगा या आकृतीला किती कडा आणि किती कोपरे आहेत? वि: बाई, ही आकृती इष्टिकाचिती आहे. म्हणून या वस्तूला एकूण १२ कडा आणि ८ कोपरे आहेत. शि: शाब्बास! म्हणून आपण दिलेल्या तक्त्यात पहिल्या आकृतीत १२ कडा आणि ८ कोपरे असे लिहू. शि: हा आहे आईस्क्रिमचा कोन. मग सांगा या आकृतीचा आकार कोणता आहे? आणि या आकृतीला किती कडा व किती कोपरे आहेत? वि: बाई, ही आकृती शंकूची आहे. आणि हिला १ कडा आणि १ कोपरा आहे.