गमंत रेषेची

प्रस्तावना गमंत रेषेची

views

5:14
आज आपण रेषेची गंमत पाहणार आहोत. रेष म्हणजे काय? हे आधी आपण पाहूया. हा बघा मी एक दोरा घेतला आहे. तो दोन्ही हातांत पकडून ताणला, तर एक सरळ रेषा दिसते. आणि तोच दोरा थोडा ढिला सोडला तर एक वक्र रेषा दिसते. आता दोऱ्याच्या एका टोकाला आपण दगड बांधू. आणि दोऱ्याचे दुसरे टोक वरच्या बाजूने धरून दगड असलेली बाजू खाली सोडू. आता आपल्याला एक उभी सरळ रेषा दिसते. मुलांनो, रेघ म्हणजेच रेषा होय. आपण दुसरीच्या पुस्तकात सरळ रेषेचाच अभ्यास करणार आहोत. म्हणून रेषा किंवा रेघ म्हणजेच सरळ रेषा असे समजू. ही चित्रे पहा. यातील प्रत्येक चित्रात वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा आपल्याला दिसत आहेत. उभी रेषा: याठिकाणी नेहाने उभ्या रेषा काढल्या आहेत. उभी रेषा म्हणजेच वरुन खालपर्यंत येणारी उभी सरळ रेषा. आडवी रेषा: अनघाने आडव्या रेषा काढल्या आहेत. आडवी रेषा म्हणजेच उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे जाणारी रेषा. तिरपी रेषा: याठिकाणी हमिदाने तिरप्या रेषा काढल्या आहेत. तिरपी रेषा म्हणजेच टेकडीसारखी तिरपी जाणारी सरळ रेषा.