चला ओळखूया भौमितिक आकृत्या

प्रस्तावना चला ओळखूया भौमितिक आकृत्या

views

5:37
तुम्हाला त्रिकोण, चौकोन, गोल हे आकार माहीत आहेत ना? त्यांनाच भूमितीतील आकृत्या म्हणतात. आज आपण भौमितिक आकृत्या शिकणार आहोत. आपण रोज अनेक वस्तू पाहत असतो. त्या वस्तूंना वेगवेगळे आकार असतात. चित्रात दाखवल्याप्रमाणे वस्तूंच्या कडाभोवती पेन्सिल फिरवून आकृती काढू आणि तयार झालेल्या आकृती कोणत्या आहेत त्या पाहू. 1) आयत: मुलांनो ही आगपेटी आहे हे तुम्हांला माहीतच असेल. तर आता आपण या आगपेटीच्या कडांभोवती पेन्सिल फिरवून आकृती काढून घेऊ. आयत. आयताला चार बाजू असतात. ही पहिली बाजू, ही दुसरी बाजू, ही तिसरी बाजू आणि ही चौथी बाजू. आणि या पहा आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. आपली कंपासपेटी, वही, मोबाईल फोन यांचा आकार आयताकृती असतो. हँगरचा उपयोग कपडे वाळवण्यासाठी होतो. किंवा कपाटात कपडे लटकवण्यासाठी होतो. आता आपण त्याच्या कडेभोवती पेन्सिल फिरवून त्याची आकृती काढून घेऊ. पाहा तयार झालेली आकृती आहे त्रिकोणाची. त्रिकोणाला 3 बाजू असतात व 3 कोन असतात. पताका, केकचा तुकडा, सामोसा ही सर्व त्रिकोणाची उदाहरणे आहेत. 4) चौरस: ही दिलेली आकृती ठोकळ्याची आहे. त्याच्या भोवती पेन्सिल फिरवून त्याची आकृती काठून घेऊ. हा तयार झालेला आकार चौरसाचा आहे. चौरसाला चार बाजू असतात व त्याच्या चारही बाजूंची लांबी सारखीच असते. फोटोफ्रेम, कॅरमबोर्ड, घड्याळ, हातरुमाल ही सर्व चौरसाची उदाहरणे आहेत.