गट मोजणी

प्रस्तावना गट मोजणी

views

3:53
तुम्हाला वस्तू मोजता येतात. वस्तू जर कमी असतील तर त्या सहज मोजून होतात. पण वस्तू जास्त असतील तर त्या मोजण्यास कठीण होतात. म्हणून जास्त वस्तू असतील तर त्यांचा गट करून मोजल्या तर त्या वस्तू आपण सहजतेने मोजू शकतो. कसे ते पाहा. या काड्या यश व रमाला मोजायला दिल्या. त्या दोघांनी वेगळ्या पद्धतीने काड्या मोजल्या. यश ने त्या काड्या १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १८, १९, २०, २१, २२, २३, २४, २५, २६, २७, २८, २९, ३०, ३१, ३२, ३३, ३४, ३५ या पद्धतीने मोजल्या. आणि रमाने त्या काड्या १० चा गट करून मोजल्या. कसे ते पहा: याठिकाणी ३५ काड्या आहेत. तर १० चा एक गट केला. दहा चा एक गट म्हणजे १ दशक. असे तिने १० काड्यांचे ३ गट केले आणि उरलेल्या ५ काड्या म्हणजे ५ एकक. म्हणजेच ३५ काड्या = ३ दशक आणि ५ एकक. मुलांनो, अशाप्रकारे दशकाचे गट करून मोजणी करणे सोपे जाते. आता अशीच काही उदाहरणे आपण सोडवूया. उदा1) अहमदच्या मित्र मैत्रिणींजवळ काही काड्या आहेत. दशकाचे गट करून त्या मोजल्या आहेत. सलमा जवळ २४ काड्या आहेत आणि शरद जवळ ४५ काड्या आहेत. तर दोघांजवळ किती दशक आणि किती एकक असतील?