ताऱ्यांची जीवनयात्रा

ताऱ्यांची निर्मिती

views

3:03
दीर्घिकेतील ताऱ्यांमध्ये काही रिक्त जागा असतात. त्यांमध्ये वायू व धुळीचे मेघ सापडतात, त्यांनाच आंतरतारकीय मेघ असे म्हणतात. ताऱ्यांमधील रिक्त जागेमध्ये धुळीचे व वायूचे मेघ दिसतात. यात विविध आंतरतारकीय मेघ दिसत असून ते प्रचंड आकाराचे असतात.हे चित्र हबल या दुर्बिणीने टिपलेले आहे.मोठी अंतरे मोजण्यासाठी शास्त्रज्ञ प्रकाशवर्ष या एककाचा वापर करतात. एका वर्षात प्रकाशाने पार केलेले हे अंतर म्हणजे एक प्रकाशवर्ष होय. प्रकाशाला ह्या मेघांच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यास काही वर्षे इतका कालावधी लागतो. कधी कधी विक्षोभामुळे हे आंतरतारकीय मेघ आकुंचित होऊन त्यांची घनता वाढत जाते. आणि तापमानही वाढत जाते.आणि त्यामधून एक तप्त वायूचा गोल तयार होतो. केंद्रातील तापमान व घनता योग्य प्रमाणात वाढल्यानंतर त्याठिकाणी अणुऊर्जा निर्मिती सुरू होते. या अणुऊर्जा निर्मितीमुळे वायूचा हा गोल स्वयंप्रकाशित होतो.