ताऱ्यांची जीवनयात्रा

ताऱ्यांचे स्थैर्य

views

4:52
एखाद्या खोलीत उदबत्ती म्हणजेच अगरबत्ती लावली की, तिचा सुगंध सर्वत्र खोलीत पसरतो. तसेच उकळत्या पाण्याच्याभांड्यावरचे झाकण काढले तर त्यातून निघणारी वाफ ही सर्व पसरते. यावरून आपल्या लक्षात येते की, तप्त वायू हे सर्वदूर पसरतात. परंतु ताऱ्यामध्ये असणारे हे तप्त वायू अवकाशात का पसरत नाहीत? किंवा सूर्याचे हे गुणधर्म जवळपास 4.5 अब्ज वर्षांपासून स्थिर कसे आहेत? असे प्रश्न आपल्याला पडतात. कारण ताऱ्यांमध्ये असणाऱ्या वायूच्या कणांतील गुरुत्वीय बल हे कणांना एकत्रित बांधून ठेवण्याचे काम करते. तसेच या वायूतील कणांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे गुरुत्वीय बल व त्याविरुद्ध कार्यरत असलेला व ताऱ्यांच्या पदार्थाला सर्वत्र पसरवण्यासाठी प्रयत्नशील असलेला ताऱ्यातील तप्त वायूचा दाब या दोन्हींमध्ये संतुलन असले तर तारा हा स्थिर असतो. उत्क्रांती म्हणजे बदल होय. ताऱ्याची उत्क्रांती म्हणजे काळाप्रमाणे ताऱ्याच्या गुणधर्मात बदल होऊन त्याचे वेगवेगळ्या अवस्थेत रुपांतर होण्याची प्रक्रिया होय. याआधी आपण सूर्याच्या गुणधर्मांविषयी अभ्यास केला आहे. आपल्या लक्षात येते की, जवळपास 4.5 अब्ज वर्षांपासून सूर्याच्या गुणधर्मात कोणताही बदल झाला नाही. ताऱ्यांची उत्क्रांती ही अतिशय संथ गतीने होत असते.