ताऱ्यांची जीवनयात्रा

ताऱ्यांची अंतिम स्थिती

views

4:17
ताऱ्याचे वस्तुमान जितके जास्त असते, तितक्याच जलद गतीने ताऱ्याची उत्क्रांती होत असते. ताऱ्याच्या उत्क्रांतीचा मार्ग हा देखील ताऱ्यांच्या वस्तुमानावर अवलंबून असतो. मुलांनो, ताऱ्यामधून होणारी ऊर्जेची निर्मिती बंद झाली की, तापमान कमी होऊन वायूचा दाब कमी होतो. त्यामुळे तारा आकुंचित होऊन त्याची घनता वाढत जाते. वायूची घनता खूप जास्त झाल्यास त्यात असे काही दाब निर्माण होतात जे तापमानावर अवलंबून असतनाहीत. अशा परिस्थितीत ऊर्जेची निर्मिती थांबली तरीही व तापमान कमी होत गेले तरीही हे दाब स्थिर अवस्थेतच राहतात.यामुळे ताऱ्याचे स्थैर्य कायम राहते.ती ताऱ्याची अंतिम अवस्था ठरली जाते. तेजोमेघ हे प्रामुख्याने धूळ व हायड्रोजन वायूचे बनलेले ढग असतात. हायड्रोजनच्या गोलाकार ढगाला तारा असे म्हणतात. पुढे तापमानात वाढ होणे आकुंचन, प्रसरण या क्रियांमुळे ताऱ्यांचे स्वरूप बदलत जाते. त्याचे भव्य तारा, तांबडा महाराक्षसी तारा अतिदीप्त तारा आणि नंतर कृष्णविवर वा न्यूट्रॉन ताऱ्यांत रूपांतर होते तर काही ताऱ्यांचे रूपांतर श्वेतबटूत होते.ताऱ्यांच्या मूळ वस्तुमानाप्रमाणे त्यांच्या उत्क्रांतीचे तीन मार्ग आहेत.