ताऱ्यांची जीवनयात्रा

सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान (8Msun<Mstar<25Msun)असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था

views

3:40
महाराक्षसी अवस्थेत त्यांचा आकार 1000 पटीपर्यंत वाढू शकतो. त्यानंतर जेव्हा यांचा विस्फोट होतो तो महाशक्तीशाली असतो. त्यातून खूप प्रचंड प्रमाणात ऊर्जाबाहेर पडते. या ऊर्जेमुळे ते तारे दिवसाही दिसू शकतात. या महाविस्फोटातून उरलेला केंद्रातील भाग आकुंचित होऊन त्याचा आकार जवळपास 10km इतका होतो. या अवस्थेमध्ये ते पूर्णतः न्यूट्रॉनचे बनलेले असतात. त्यामुळे त्यांना न्यूट्रॉन तारे असे म्हटले जाते. या ताऱ्यातील न्यूट्रॉनमुळे तयार झालेला दाब तापमानावर अवलंबून नसतो. तो अनंतकालापर्यंत गुरुत्वीय बलास संतुलित करण्यास पूर्णपणे सक्षम असतो. म्हणूनच न्यूट्रॉन तारेही या ताऱ्यांची अंतिम अवस्था असते. आता आपण आपल्या अवकाशातील ताऱ्यांविषयी काही आश्चर्यकारक गोष्टींची माहिती घेऊया. 1)श्वेत बटूंचा आकार पृथ्वीइतका लहान आहे. त्यामुळे त्यांची घनता खूप जास्त असते. त्या ग्रहातील एक चमचा पदार्थाचे वजन हे काही टनांमध्ये असते. तर न्यूट्रॉन ताऱ्यांचा आकार हा श्वेत बटूपेक्षा खूप लहान असतो. त्यामुळे त्यांची घनता याहून जास्त असते. त्यातील एक चमचा पदार्थाचे वजन हे पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांच्या वजनाएवढे असेल.