चला शोधूया वेगवेगळे आकार

प्रस्तावना चला शोधूया वेगवेगळे आकार.

views

4:46
मला सांगा आपल्या रोजच्या जेवणात कोणकोणत्या गोष्टी असतात? भाजी, पोळी, वरण, भात, मासे, भाकरी, आमटी, चटणी, लोणचे. मग तुम्हांला काही भाज्यांची नावे सांगता येतील का? टोमॅटो, कांदे, बटाटे, वांगी, काकडी, मिरची, कोबी, भेंडी या सर्व भाज्या आहेत. या भाज्या बाजारात कुठून येतात? भाजी मंडईतून, शेतातून, मळ्यातून. मग आज आपण जी कविता शिकणार आहोत त्या कवितेतील मंडळी शेतात फिरायला गेली आहेत. चला तर मग आपण पाहूया ते शेतात काय काय करताहेत ते. रविवारी सगळे शेतावर गेले फिरायला, फिरताना सांगितले होते भाजी गोळा करायला. रविवारी सुट्टी असते म्हणून मग सगळ्यांनी ठरवलं शेतात फिरायला जायचे. शेतात गेल्यावर आईने सगळ्यांना भाज्या गोळा करून आणायला सांगितल्या. गाजरे आणली मोत्याने उकरून मऊ माती, टोके त्यांची शंकू सारखी, हिरवी पाने वरती. तुम्ही सगळ्यांनी गाजरं पाहिलीच आहेत. हे गाजर जमिनीखाली वाढते. मोतीने मऊ मऊ माती उकरून जमिनीखालून गाजरं काढली. तुम्ही वाळूतला शंख पाहिला असेल. त्याला खालून जसे टोक असते तसेच टोक गाजराला असते आणि वरच्या बाजूला हिरवी हिरवी पाने असतात. यशने आणली वांगी नि टोमॅटो लाल आंबट, टोमॅटो छान गोल, पण वांगी जरा लांबट. यशने शेतातून वांगी आणि टोमॅटो आणले. त्याने आणलेली वांगी आकाराने लांबट होती. मात्र टोमॅटो छान गोल गोल होते. आणि त्यांचा रंगही लाल- लाल होता. पण टोमॅटो चवीला थोडे आंबटच होते. वेलीवरून रमाने तोडून आणल्या काकड्या, काही दंडगोल, पण काही कमरेत वाकड्या. रमा पण भाजी आणायला गेली. तिला काकडीची वेल दिसली. तिने काकड्या तोडल्या त्यात काही काकड्या दंडगोल व काही काकड्या वाकड्या होत्या. दंडगोल म्हणजे तुमच्याकडे जी पाण्याची बाटली आहे त्या बाटलीच्या आकाराला दंडगोल म्हणतात. झाडावर चढून गंपूने चिंचा आणल्या तोडून खुशीत परतली मनी, तिला सापडला लसूण.