बेरजेची गंमत

प्रस्तावना बेरजेची गंमत

views

2:45
आज आपण बेरजेची गंमत शिकणार आहोत. हे उदाहरण पहा. एका तळ्याकाठी ५ बेडूक आहेत आणि काही वेळाने तिथे आणखी २ बेडूक आले. तर पहिले ५ आणि नंतर आलेले २ बेडूक मिळून ७ बेडूक होतील. बरोबर? आता हेच उदाहरण आपण उलटे करून पाहू. आता समजा तळ्याकाठी २ बेडूक होते आणि त्यानंतर तिथे आणखी ५ बेडूक आले. तर पहिले २ आणि नंतर आलेले ५ बेडूक मिळून ७ बेडूकच होतील. आहे की नाही गंमत? म्हणजेच ५ आणि २ मिळून ७ झाले काय किंवा २ आणि ५ मिळून ७ झाले काय. दोन्ही सारखेच असतात. आहे की नाही ही बेरजेची गंमत? याचाच अर्थ संख्यांचा क्रम बदलला तरी बेरीज बदलत नाही. हे आपल्याला ह्या उदाहरणावरून समजून येते.