बेरीज-पुढे मोजून

पुढे मोजून बेरीज कर

views

4:16
आता मी तुम्हांला काही उदाहरणे सांगते. त्यांची उत्तरे तुम्ही सांगायची आहेत. मोजून बेरीज करा. रमाजवळ १८ चिंचोके आहेत आणि यशजवळ ७ चिंचोके आहेत तर दोघांजवळ मिळून किती चिंचोके आहेत? काय दिले आहे? रमाचे व यशचे चिंचोके. काय विचारले आहे? दोघांचे एकूण चिंचोके काय करूया? बेरीज बरोबर! मग बेरीज कशी करणार? १८ च्या पुढे ७ अंक मोजू. १९,२०,२१,२२,२३,२४,२५ म्हणून १८+७=२५ झाले. अगदी बरोबर! म्हणून चौकटीत उत्तरात २५ ही संख्या लिहू. इथे काही उदाहरणे दिली आहेत. त्यात एक संख्या दिली आहे आणि उत्तर दिले आहे. तर पहिल्या संख्येत अशी कोणती दुसरी संख्या मिळवली की दिलेले उत्तर मिळेल ती संख्या तुम्हांला शोधायची आहे. उदाहरणार्थ ८ मध्ये कोणती संख्या मिळवावी लागेल म्हणजे उत्तर १४ मिळेल. ही संख्या मिळवण्यासाठी काय करावे लागेल? तर ८ च्या पुढे १४ येईपर्यंत घरे मोजावी लागतील. ९,१०,११,१२,१३,१४. म्हणजेच ८ च्या पुढे आपण ६ घरे मोजली. म्हणून ८ मध्ये ६ मिळवले तर १४ ही संख्या मिळाली. म्हणून चौकटीत ६ हा अंक लिहू. मग सांगा ९ मध्ये कोणती संख्या मिळवली तर उत्तर मिळेल १६? ९ च्या पुढे १६ पर्यंत ७ घरे मोजली म्हणून ती संख्या ७ असेल. अगदी बरोबर! १० मध्ये कोणती संख्या मिळवली तर उत्तर २२ मिळेल? १० च्या पुढे २२ पर्यंत १२ घरे मोजली. म्हणून ती संख्या १२ असेल. बरोबर! १५ मध्ये कोणती संख्या मिळवली तर उत्तर मिळेल २८? १५ च्या पुढे २८ पर्यंत १३ घरे मोजली तर उत्तर २८ आले. म्हणून ती संख्या १३ असेल. अगदी बरोबर!