शून्याची बेरीज व वजाबाकी

प्रस्तावना शून्याची बेरीज व वजाबाकी

views

4:42
आज आपण शिकणार आहोत शून्याची बेरीज आणि वजाबाकी कशी करतात? शून्य म्हणजे काहीच नाही. एखाद्या वस्तूमध्ये किंवा अंकामध्ये शून्य मिळवला तर त्या वस्तूत काहीच फरक पडत नाही. ती वस्तू किंवा अंक तेवढाच राहतो. त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूतून किंवा अंकातून शून्य वजा केल्यास त्याही वस्तूत काहीही फरक पडत नाही. या बशीत तीन सफरचंदे आहेत. आणि ही दुसरी बशी रिकामी आहे. म्हणजे येथे शून्य सफरचंदे आहेत. आता मी या रिकाम्या बशीतील शून्य सफरचंदे या पहिल्या बशीत ठेवते. आता पहा या पहिल्या बशीत किती सफरचंदे झाली? ही तर तीनच सफरचंदे आहेत. मी येथे शून्य सफरचंदे मिळवली म्हणजे काहीच मिळवले नाही. म्हणून ही सफरचंदे आहेत तेवढीच राहिली. त्यांच्यात वाढ झाली नाही. पहिल्या बरणीत ५ चॉकलेटं आहेत. आणि दुसऱ्या बरणीत 0 चॉकलेटं आहेत म्हणजे त्या बरणीत काहीच चॉकलेटं नाहीत. मग ५ मध्ये 0 मिळवणार, म्हणजे काहीच नाही मिळवणार. म्हणून एकूण ५+० = ५ च चॉकलेटं होतील रमाजवळ २ सफरचंदे आहेत. तिच्या लहान बहिणीला सफरचंद खूप आवडतं. म्हणून तिने दोन्ही सफरचंदे बहिणीलाच ठेवली. तिने एकही खाल्ले नाही. मग रमाकडे किती सफरचंदे शिल्लक राहतील?