गोष्टीतील बेरीज१

प्रस्तावना गोष्टीतील बेरीज१

views

5:46
आपण छोट्या छोट्या गोष्टीतील आकड्यांची बेरीज कशी करायची ते पाहू. मनज्योतने बदामाची १४ झाडे आणि पेरूची २१ झाडे लावली, तर तिने एकूण किती झाडे लावली? सांगा बरं या उदाहरणात काय काय दिले आहे? या गोष्टीत मनज्योतने बदामाची १४ झाडे आणि पेरूची २१ झाडे लावली आहेत. आणि एकूण किती झाडे लावली आहेत हे विचारले आहे. यासाठी आपल्याला बेरीज करावी लागेल. सर्वात आधी उजव्या बाजूच्या वरच्या चौकटीत एकक म्हणजे ‘ए’ लिहू. आणि डाव्या बाजूच्या वरच्या चौकटीत दशक म्हणजे ‘द’ लिहू. आता गणिताची मांडणी करू. बदामाची एकूण झाडे १४ आहेत म्हणून एककाच्या घरात ४ आणि दशकाच्या घरात १ लिहू. तसेच पेरूची एकूण झाडे २१ आहेत म्हणून एककाच्या घरात १ आणि दशकाच्या घरात २ लिहू. आता यांची बेरीज करू. ४+१ एकक मिळून ५ एकक झाले. म्हणून एककाच्या चौकटीत ५ हा अंक लिहू. तसेच १+२ दशक मिळून ३ दशक झाले. म्हणून दशकाच्या चौकटीत ३ अंक लिहू. म्हणजेच १४+२१=३५. म्हणून मनज्योतने एकूण ३५ झाडे लावली. रवीकडे १५ फुगे आहेत. नीताकडे २१ फुगे आहेत. दोघांकडे मिळून किती फुगे आहेत? या गोष्टीत रवीकडे १५ फुगे आणि नीताकडे २१ फुगे आहेत. आणि दोघांकडे एकूण किती फुगे आहेत ते काढायचे आहे. वरील प्रमाणे गणित उभ्या मांडणीत मांडून घेऊ. १५ मधील ५ एककाच्या घरात आणि १ दशकाच्या घरात लिहू. तसेच २१ पैकी १ एककाच्या घरात आणि २ दशकाच्या घरात लिहू. आता सर्वांची बेरीज करू. 5 आणि १ मिळून ६ एकक झाले. आणि १+२ मिळून ३ दशक झाले. म्हणजेच १५ + २१ = ३६ फुगे दोघांकडे मिळून आहेत.