वर्षाचे बारा महिने

प्रस्तावना

views

4:49
बेरीज वजाबाकी जोडी. बेरीज म्हणजे एखाद्या संख्येत दुसरी संख्या मिळवणे होय. आणि वजाबाकी म्हणजे एखादी संख्या दुसऱ्या संख्येतून वजा करणे, उणे करणे होय. उदा१) १० + १२=२२ हे उदाहरण पहा. या उदाहरणात २२ – १० केले तर १२ हे उत्तर मिळते. आणि २२ मधून १२ वजा केले तर १० हे उत्तर मिळते. म्हणजे २२ मधून दोघांपैकी कोणतीही संख्या वजा केली तरी उत्तर बेरजेच्या गणितात असणारी दुसरी संख्या असते. सांगा आहे की नाही गम्मत? वि: हो सर. हे गणित जरी बेरजेचे असले तरी या उदाहरणात आपल्याला वजाबाकीची दोन उदाहरणे मिळतात. उदाहरण: ७१ + २२ = ९३. उत्तर: ७१ आणि २२ यांची बेरीज ९३ येते. यावरून आपल्याला वजाबाकीची दोन उदाहरणे तयार करता येतील. जर ९३ मधून ७१ वजा केले तर २२ राहतात. आणि ९३ मधून २२ वजा केले की ७१ शिल्लक राहतात. म्हणजे ९३ मधून कोणतीही एक संख्या वजा केली तरी येणारे उत्तर बेरजेच्या गणितातील दुसरी संख्याच आहे. अशा प्रकारे याही बेरजेच्या उदाहरणात वजाबाकीची दोन उदाहरणे मिळाली. परंतु जर आपण ५+५=१० हे उदाहरण घेतले तर यात १०-५ केले तर ५ ही एकच वजाबाकी मिळते. म्हणजेच प्रत्येक वेळी दोन जोड्या मिळतीलच असे नाही.