गोष्टीतील वजाबाकी

प्रस्तावना

views

3:05
सर्वांनाच गोष्ट खुप आवडते. आता आपण गोष्टीतील वजाबाकी शिकणार आहोत. यासाठी एक उदाहरण बघूया. उदाहरण: वैशालीने ५४ मणी आणले होते. माळ करून झाल्यावर तिच्याकडे २१ मणी उरले तर तिने माळेत एकूण किती मणी ओवले? सांगा बरं, काय दिले आहे या उदाहरणात? वैशालीने ५४ मणी आणले आणि २१ मणी उरले. काय विचारले आहे? किती मणी माळेत ओवले? मग काय करूया? वजाबाकी. बरोबर, दशकाच्या एका माळेमध्ये १० मणी असतात. म्हणून ५४ मध्ये १० च्या ५ माळा तयार होतील आणि ४ सुट्टे मणी राहतील. तसेच २१ मण्यांमध्ये १० च्या २ माळा तयार होतील आणि १ सुट्टा मणी राहील. आता आपण या संख्यांची वजाबाकी करण्यासाठी हे गणित आपण उभ्या मांडणीत लिहू. पहा ४ एकक मधून १ एकक गेले तर ३ एकक राहिले. आणि ५ दशकातून २ दशक कमी केले तर ३ दशक राहिले. म्हणजेच ५४ – २१ = ३३ म्हणून माळेत एकूण ३३ मणी ओवले. म्हणजे तुम्हांला आता मांडणीतील वजाबाकी सहज करता येते.