गोष्टीतील वजाबाकी

शाब्दिक उदाहरणे

views

4:14
आपण वजाबाकीची काही शाब्दिक उदाहरणे सोडवू. उदा. १) आनंदने गोष्टीची २८ पुस्तके वाचली. सागरने १४ पुस्तके वाचली. तर आनंदने किती पुस्तके जास्त वाचली? सांगा काय दिले आहे? आनंदने वाचलेली २८ आणि सागरने वाचलेली १४ पुस्तके दिली आहेत. काय विचारले आहे? आनंदने सागरपेक्षा किती पुस्तके जास्त वाचली. मग काय करूया? वजाबाकी. प्रथम आपण हे उदाहरण उभ्या मांडणीत लिहून मग वजाबाकी करू. तर तुम्हीच सांगा ही मांडणी कशी करायची? आणि गणित कसे सोडवायचे? २८ मधील ८ एककाच्या घरात आणि २ दशकाच्या घरात लिहा. मध्ये वजाबाकीचे चिन्ह द्या. त्यानंतर १४ मधील ४ एककाच्या घरात आणि १ दशकाच्या घरात लिहा. आता यांची वजाबाकी करा. ८ एककातून ४ एकक गेले राहिले ४. आणि २ दशकातून १ दशक गेला राहिला एक. म्हणजेच २८-१४ = १४. म्हणून आनंदने सागरपेक्षा १४ पुस्तके जास्त वाचली खुपच छान!