बेरीज-वजाबाकी जोडी

प्रस्तावना

views

3:40
आज आपण इंग्रजी आणि मराठी वर्षाचे बारा महिने पाहणार आहोत. मुलांनो, काल कोणता वार होता? आज कोणता वार आहे किंवा उद्या कोणता वार असेल हे आपल्याला कशावरून कळते? त्याच कॅलेंडरला मराठीमध्ये दिनदर्शिका असे म्हणतात. या दिनदर्शिकेमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे बारा इंग्रजी महिने असतात. वर्षाची सुरुवात जानेवारी महिन्यापासून होते आणि डिसेंबरला संपते. यामध्ये चार महिने पावसाळा, चार महिने हिवाळा आणि चार महिने उन्हाळा असतो. जानेवारी ते डिसेंबर या सर्व महिन्यांत सारखेच दिवस नसतात. काही महिन्यांत ३० दिवस असतात तर काही महिन्यांत ३१ दिवस असतात. फेब्रुवारी महिन्यात मात्र २८ किंवा २९ दिवस असतात. भारतीय वर्षाचे महिने. चैत्र, वैशाख, जेष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष म्हणजेच अग्रहायण, पौष, माघ आणि फाल्गुन हे १२ महिने असतात. वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते आणि फाल्गुन महिन्याला वर्ष संपते.