बेरीज-वजाबाकी जोडी

शालेय दिनदर्शिका

views

2:45
शालेय दिनदर्शिका रमेश आणि यश यांच्यामध्ये संवाद सुरु आहे तो आता आपण ऐकू. यश या डिसेंबर महिन्यात आपल्या शाळेत काय काय होणार आहे ठाऊक आहे का तुला? आपल्या शाळेच्या दिनदर्शिकेत दिलेले आहेच की! मग सांग बरं शाळेत चित्रकला स्पर्धा किती तारखेला आहे. २० तारखेला आणि क्रीडा स्पर्धा किती दिवस आहेत? १२ आणि १३ असे २ दिवस आहेत. आता तू सांग २५ डिसेंबरला कोणता सण आहे? सोप्पंय! नाताळ आहे. बरं ठीक आहे मी निघतो आता. उद्या वनभोजन आहे. मला तयारी करायची आहे. मला सांगा रमेश आणि यश यांच्यातील हा संवाद किती तारखेला झाला असेल? हा संवाद ६ तारखेला झाला असेल. कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी वनभोजन आहे. आणि वनभोजन ७ तारखेला दिले आहे. आज आपण या पाठातून इंग्रजी महिने, मराठी महिने आणि ऋतू यांचा अभ्यास केला आहे. तुम्हाला या गोष्टी पुढे नेहमीच उपयोगी पडणार आहेत.