संख्येचे शेजारी, लगतची, मागची व पुढची संख्या

प्रस्तावना

views

4:14
आज आपण संख्येचे शेजारी, लगतची, मागची व पुढची संख्या कोणती असते याचा अभ्यास करणार आहोत. एखाद्या संख्येच्या पुढे किंवा मागे लगतच्या संख्या असतात. संख्या रेषा अशी असते. एका रेषेवर डाव्या बाजूला शून्य या संख्येची खूण असते. तेथून सोईचे लहान अंतर घेऊन, एकापुढे एक मोजून सारख्या अंतरावर १,२,३,४....अशा संख्या लिहिलेल्या असतात. या रेषेचा कोणताही भाग पहा. या रेषेवरील कोणतीही एक संख्या घ्या. समजा २३ ही संख्या घेतली. तर २३ च्या लगतची मागची संख्या २२ आहे. आणि लगतची पुढची संख्या २४ आहे. २२ - २३ - २४. लगतच्या मागच्या व पुढच्या संख्यांमध्ये एक गंमत असते. ती गंमत म्हणजे कोणत्याही संख्येच्या डावीकडची म्हणजे लगतची मागची संख्या १ ने कमी असते, तर उजवीकडची म्हणजेच पुढची संख्या १ ने जास्त असते. पहा २३ ची लगतची मागची संख्या २२ आहे. आणि २२ ही २३ पेक्षा १ ने कमी आहे. तर २३ च्या पुढची लगतची संख्या २४ आहे. ती २३ पेक्षा १ ने जास्त आहे.