चला संख्या तयार करूया Go Back दोन अंक निवडून संख्या तयार करणे views 4:21 आज आपण दिलेल्या अंकांपासून संख्या कशा तयार करायच्या ते शिकणार आहोत. १ पेक्षा जास्त अंक घेऊन संख्या तयार केल्या जातात. उदा. आपण १ आणि ८ या दोन संख्या घेऊ. १ आणि ८ या संख्या एकत्र लिहिल्या तर १८ ही संख्या तयार होते. तेच अंक पुढचे मागे व मागचे पुढे केले तर ८१ ही संख्या तयार होते. रमा आणि यश संख्या बनविण्याचा खेळ खेळत आहेत. आपणही खेळू. वर्तुळात काही अंक दिले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने दोन अंक निवडायचे आहेत आणि संख्या तयार करायच्या आहेत. मी ७ आणि ५ हे अंक निवडते. ७ आणि ५ हे अंक एकत्र लिहिले तर ७५ ही संख्या तयार होते. हेच अंक घेऊन या अंकाची जागा बदलली तर ५७ ही संख्या तयार होते. म्हणून पहिल्या चौकटीत ७५ आणि दुसऱ्या चौकटीत ५७ या संख्या लिहा. मी ३ आणि ८ हे अंक निवडतो. ३ आणि ८ हे अंक एकत्र लिहले तर ३८ ही संख्या तयार होते. आणि क्रम बदलून लिहिले तर ८३ ही संख्या तयार होते. म्हणून पहिल्या चौकटीत ३८ आणि दुसऱ्या चौकटीत ८३ ही संख्या लिहा. दोन अंक निवडून संख्या तयार करणे खेळ