चला संख्या तयार करूया

खेळ

views

4:53
आता आपण एक खेळ खेळूया. माझ्याकडे १ ते ९ अंकांची ही कार्डे आहेत. मी तुम्हांला प्रत्येकी एक कार्ड देणार आहे. तुम्ही तुमच्या सोबत एका मित्राची किंवा मैत्रिणीची जोडी करायची. नंतर तुमचा अंक आणि तुमच्या जोडीदाराचा अंक एकत्र करून कोणत्या दोन संख्या तयार होतात ते सांगायचे आहे. कळले? फुलाच्या पाकळ्या दिल्या आहेत. आणि त्यात वेगवेगळे अंक दिले आहेत. तर आता आपल्याला पाकळीतील वेगवेगळे दोन अंक घेऊन त्यापासून होतील तेवढ्या दोन अंकी संख्या तयार करून त्यातील सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या ओळखायची आहे. पहिल्या पाकळ्यांत कोणत्या दोन संख्या आहेत? बाई ४ आणि ७ मग यापासून कोणत्या २ संख्या तयार होतील? ४७ आणि ७४. यातील कोणती संख्या मोठी आहे? ४७ की ७४? बाई ७४ ही संख्या ४७ पेक्षा मोठी आहे. अगदी बरोबर! आता समजलं?