वजन करूया

वजन करणे

views

4:51
आज आपण आपल्या दैनानिदिन वापरातील कोणत्या वस्तू जड आणि कोणत्या हलक्या आहेत ते पाहणार आहोत. हे पाहा, इथे हा चेंडू ठेवला आहे आणि त्याच्या शेजारी हे मोराचे पीस ठेवले आहे. मग सांगा या दोघांपैकी कोणती वस्तू जड असेल? मोराचे पीस की चेंडू? चेंडू जड असेल. कारण मोराचे पीस तर खूपच हलके आणि मऊ असते. हा चावीचा गठ्ठा आहे. आणि त्याच्या शेजारी हवेने फुगवलेला फुगा आहे. मग सांगा यातील कोणती वस्तू वजनाने हलकी असेल? हवेचा फुगा वजनाने हलका असेल. इथे मी काहीं वस्तूंचे वजन करते. तुम्ही सांगा यातील कोणती वस्तू जड आणि कोणती वस्तू हलती आहे. हे पाहा, या पारड्यात मी डाळिंब ठेवले आहे आणि या पारड्यात कलिंगड मग सांगा यातील कोणते फळ हलके आणि कोणते जड आहे? डाळिंब हलके आणि कलिंगड जड आहे.