गुणाकाराची पूर्वतयारी

मोजा पाहू चटकन

views

4:16
एकाच संख्येची पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजे गुणाकार असतो. तर आज आपण बेराजेकून गुणाकार कसा करायचा ते पाहू. ४ बश्या दिल्या आहेत. आणि त्या प्रत्येक बशीत २ पेरू ठेवले आहेत. आता जर आपल्याला हे सर्व पेरू एकूण किती आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला काय करावे लागेल? सर्व बशीतल्या पेरूंची बेरीज करावी लागेल. म्हणजे 2+2+2+2 = ८ पेरू होतील. पण समजा अशा ८ बशा असतील आणि प्रत्येकात २ पेरू असतील तर ते कसे मोजाल? तेव्हा पान २ ची ८ वेळा बेरीज करू. म्हणजे 2+2+2+2+2+2+2+2 = १६ पेरू असतील. अशा पद्धतीने गुणाकार करताना खूप वेळ जातो. जेव्हा मोठ्या संख्यांचा गुणाकार करायचा असतो तेव्हा अशी पद्धत फारशी कामी येत नाही. म्हणूनच गुणाकार करण्यासाठी आपल्याला पाढे पाठ असणे गरजेचे आहे.