गोष्टीतील गणित

गोष्टीतील गणित

views

3:13
मी आता तुम्हांला एक गोष्ट सांगते. ती सांगत असताना मधेच तुम्हांला काही प्रश्न विचारेन. त्या उत्तरातून मला समजेल की तुमचे गणित किती पक्के आहे आणि तुमचे गोष्टीकडे किती लक्ष आहे. यशच्या घरी रमा व आणखी ५ मुले खेळायला जमली होती. मग सांगा खेळण्यासाठी एकूण किती मुले होती? ७ मुले होती. ती कशी काय? यश स्वत:, रमा आणि तिच्या सोबत आलेली ५ मुले. झाली एकूण ७. यश चा सुरेशमामा गावाहून आला. मुलांना खेळताना पाहून त्यालाही मजा वाटली. तो म्हणाला “ मुलांनो या आज मी तुम्हांला ग्रीक राजाचा मुकुट कसा करायचा ते शिकवतो.” मुलेही खुश झाली. प्रथम त्याने कार्डपेपरची पट्टी घेतानी. त्यावर तिरक्या रेषांची नागमोड काढली. नंतर त्याने ती नागमोड कापून तीचे दोन वेगळे भाग तयार केले. आणि मुलांना त्या दोन्ही भागांवर सुंदर नक्षी काढून ते रंगवण्यास सांगितले. मुलांनीही त्यावर छान नक्षी काढून ते रंगवले. नंतर सुरेशमामाने त्या दोन्ही भागांना स्टेपलर लाऊन त्याचे मुकुट तयार केले. ते मुकुट पाहून मुले खूप खुश झाली.