आपत्ती व्यवस्थापन

उष्माघात

views

3:9
उष्माघात हा प्रखर उन्हामुळे होतो. जास्त वेळ उन्हात राहिल्यामुळे शरीरातील पाण्याचे व क्षारांचे प्रमाण अत्यंत कमी होते त्यामुळे उष्माघात होतो. उपाय:- • उष्माघात झालेल्या रुग्णास सावलीत किंवा थंड ठिकाणी न्यावे. • त्याचे शरीर थंड पाण्याने पुसून घ्यावे. • त्याच्या मानेवर थंड पाण्याने भिजलेले कापड ठेवावे. • उष्माघात झालेल्या रुग्णास भरपूर पाणी किंवा सरबतासारखी पेये द्यावीत.• उष्माघातामुळे उल्टी झाली किंवा अशक्तपणा आला असेल तर रुग्णाची मान एका बाजूस करून उताणे झोपायला लावावे.• तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी किंवा त्या रुग्णाला दवाखान्यात न्यावे.