भारतीय उपखंड आणि इतिहास Go Back सिंधू – गंगा – ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश views 4:35 सिंधू – गंगा – ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश : गंगा, यमुना, सरस्वती, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा या भारतातील प्रमुख नद्या आहेत.या नद्यांपैकी गंगा, यमुना, सरस्वती व सिंधू या भारताच्या उत्तर पठारावरील नद्या तर गोदावरी, कृष्णा या दक्षिण पठारावरील नद्या आहेत. यातील उत्तर पठारावरील सिंधू, गंगा व ब्रह्मपुत्रा या प्रमुख नद्या आहेत. या नद्यांनी व त्यांच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या प्रदेशाला व त्यांच्या खोऱ्याच्या प्रदेशाला मैदानी प्रदेश म्हणतात. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा जगातील सर्वात मोठा गाळाचा मैदानी प्रदेश आहे. पश्चिमेकडे सिंधू नदीच्या मुखापासून पूर्वेकडे गंगा नदीच्या मुखापर्यंत साधारणत: ३२०० कि.मी. पसरलेला हा मैदानी प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडील सिंध पंजाब पासून पूर्वेकडील सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरला आहे. हे मैदान प्रामुख्याने हिमालयातील नद्यांनी आणलेल्या गाळामुळे तयार झालेले आहे. तसेच हा प्रदेश हिमालय पर्वताच्या दक्षिणेला आणि दख्खनच्या पठाराच्या उत्तरेला पसरला आहे. याच प्रदेशात भारतातील सर्वात मोठी प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती व त्यानंतरची प्राचीन गणराज्ये आणि साम्राज्ये उदयास आली.थरचे वाळवंट : थरचे वाळवंट हे २,००,००० चौरस कि.मी. क्षेत्रफळाचे आहे. हे आकारमानाने जगातील सातव्या व आशियातील तिसऱ्या क्रमांकाचे वाळवंट आहे. हे वाळवंट राजस्थान, गुजरात आणि हरियाणा या राज्यांत पसरलेले आहे. या वाळवंटाचा काही भाग ह्या तीन राज्यांत आहे तसाच आजच्या पाकिस्तानातही आहे. थरचे वाळवंट हे भारत व पाकिस्तान या दोन देशांच्या सरहद्दीवरचे वाळवंट आहे. इतिहासाची घडण आणि वैशिष्ट्ये भाग 1 इतिहासाची घडण आणि वैशिष्ट्ये भाग 2 भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये भाग १ सिंधू – गंगा – ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये भाग 2 समुद्रातील बेटे