भारतीय उपखंड आणि इतिहास Go Back समुद्रातील बेटे views 2:58 समुद्रातील बेटे : चारही बाजूंनी वेढलेला जमिनीचा भाग म्हणजे बेट होय. जगात असे काहीच देश आहेत जे बेट आहेत उदा. श्रीलंका, वेस्टइंडीज, न्यूझीलंड, इंग्लंड इत्यादी. भारतातही अशी बेटे आहेत. प्रामुख्याने त्यांचे दोन भाग पडतात. १) बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे २) अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटांचा समूह. अंदमान बेटावर असलेले पोर्ट ब्लेअर शहर हे अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी आहे. या बेटांवर दगडी कोळसा, तांबे व गंधक ही खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट हे भारताच्या सरहद्दीचे शेवटचे टोक आहे. तर लक्षद्वीप हे भारतातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. कवरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फॅास्फेट, कॅल्शीयम, कार्बोनेट ही येथील प्रमुख खनिजे आहेत.प्राचीन काळी व्यापारासाठी या बेटांचे खूप महत्त्व होते. त्यामुळे जुन्या ग्रंथांमध्ये त्यांचे उल्लेख आढळतात. ‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी’ म्हणजे ‘तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक’या पुस्तकात भारतीय बेटांची विशेष माहिती दिली आहे. हे पुस्तक एका ग्रीक खलाशाने लिहिले आहे. इसवी सनाच्या बाराव्या-तेराव्या शतकातील प्रसिद्ध जगप्रवासी मार्को पोलो यानेही आपल्या प्रवास वर्णनांत या बेटांचा उल्लेख ‘नेकुवेरन’ (Necuveran) असा केलेला आढळतो.भारतीय उपखंड : अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूटान, श्रीलंका व भारत हे सात देश मिळून होणारा भूभाग म्हणजे दक्षिण आशिया होय. यातील भारताचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन याला भारतीय उपखंड म्हटले आहे. हा जगातील एकच असा भूभाग आहे ज्याला उपखंड असे संबोधले जाते. भौगोलिक दृष्टीने, 'उपखंड' ही संज्ञा वापरली जाते कारण हा भाग स्वतःच्या प्रस्तरावर वसला आहे. इतिहासाची घडण आणि वैशिष्ट्ये भाग 1 इतिहासाची घडण आणि वैशिष्ट्ये भाग 2 भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये भाग १ सिंधू – गंगा – ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये भाग 2 समुद्रातील बेटे