भारतीय उपखंड आणि इतिहास

इतिहासाची घडण आणि वैशिष्ट्ये भाग 2

views

4:35
तर दोन भिन्न प्रदेशांत राहणाऱ्या लोकांची वेशभूषा, आहार, व्यवसाय, घरबांधणी, चालीरीती, सण-उत्सव, परंपरा या त्या परिसराच्या भौगोलिक किंवा नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतात. तसेच त्यांचे समाजजीवन हेही भौगोलिक घटकांवरच अवलंबून असते.भौगोलिक घटक कोणते आहेत?महासागर, जमीन, हवा, पाणी, वाळवंट, मैदाने, डोंगर, पर्वत, ओढे, दऱ्या, बेटे, घाट हे सर्वच.या सर्वांचा मानवावर व पर्यायाने इतिहासावर कसा परिणाम होतो ते बघूया. उदा. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन हे मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. मैदानी प्रदेश म्हणजे सपाट प्रदेश. तिथे नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ असतेा त्याच्यापासून सुपीक असा मोठा भूप्रदेश तयार होतो. त्याला मैदाने म्हणतात. डोंगराळ प्रदेशातील लोकांना शेतजमीन कमी असल्याने डोंगराळ तृणधान्ये, भाज्या कमी प्रमाणात मिळतात. त्याचा परिणाम खाण्या – पिण्यावर झालेला दिसतो. येथील लोकांना आपली अन्नाची गरज भागवण्यासाठी शिकार व जंगलातून गोळ्या केलेल्या विविध पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते. उदा. मध, डिंक, औषधी वनस्पती, फळे, इत्यादी. डोंगरी प्रदेशात लोकवस्तीही तुरळक असते. त्यामुळे दळणवळणाची साधने अपुरी असतात. डोंगरामुळे संदेश-दळणवळण बिनभरंवशाचे असते.पण मैदानी प्रदेशात शेती चांगली असल्यामुळे तृणधान्ये, भाज्या हे मुबलक प्रमाणात मिळतात. अशाच प्रकारचा फरक या दोन्ही प्रदेशांत इतर गोष्टींमध्ये ही आढळतो.