हडप्पा संस्कृती

घरे आणि नगररचना

views

3:24
हडप्पा संस्कृतीतील घरे, इतर बांधकामे भाजक्या विटांची होती. तर काही ठिकाणी कच्च्या विटा व दगडांचा वापर बांधकामासाठी केला होता. तुम्ही जर खेडयातील घरे बघितलीत तर तुम्हांला समजेल की, दगडांचा वापर करून कसे बांधकाम करतात ते. हडप्पा संस्कृतीत प्रत्येक प्रभागात २० ते ३० घरे असत. हडप्पा संस्कृतीतील घरांची रचना ही मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची होती. घरांच्या मध्यभागी, जसे आजही वाड्यांच्या व इतर भारतातील पारंपरिक घरांमध्ये असते, तसे अंगण असे. सुंबरान, श्री राजा शिवछत्रपती या सिनेमात अशा प्रकारची रचना पाहायला मिळेल. तसेच घरांच्या आवारातच विहिरी, स्नानगृहे म्हणजे बाथरूम, शौचालये ही असत. हडप्पा संस्कृतीत सांडपाणी व पावसाचे पाणी गावाबाहेर वाहून नेण्यासाठी एक मीटर खोल भुयारी गटारांची व्यवस्था होती. ही गटारे दगड व पक्क्या विटांनी बांधलेली होती. घरातील सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था केलेली असे. त्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळींचा उपयोग केला जाई. तसेच रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत. ती वरून झाकलेली असत. यावरून सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत त्यावेळचे लोक किती जागरूक होते ते समजते. शहराच्या प्रभागाकडून जाणारे रस्ते मुख्य रस्त्यांना जोडलेले असत. या ठिकाणचे रस्ते रुंद होते आणि ते एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले असत. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात.