हडप्पा संस्कृती

ऱ्हासाची कारणे

views

3:02
आताच्या युगात व हडाप्पाकालीन संस्कृतीमध्ये बरेच साम्य आहे. त्यावरून कळते की हडप्पा संस्कृती एक प्रगत नागर संस्कृती होती. तरी या संस्कृतीचा ऱ्हास झाला. ऱ्हास होणे म्हणजे नाश पावणे, नष्ट होणे. बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, व्यापारातील घट यांसारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासास कारणीभूत होत्या. तसेच पुन्हा पुन्हा येणारे महापूर, पर्जन्यमान कमी होणे, म्हणजेच पावसाचे प्रमाण कमी त्यामुळे दुष्काळ पडणे, नद्यांची पात्रे कोरडी पडणे, भूकंप व समुद्रपातळीतील बदल यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे लोकांनी मोठया प्रमाणावर स्थलांतर केले. म्हणजे लोक ते ठिकाण सोडून दुसरीकडे वास्तव्यास गेली. त्यामुळे काही स्थळे उजाड झाली. आणि हडप्पा संस्कृतींमधील शहरांचा ऱ्हास झाला. हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली प्रगत अशी नागर संस्कृती होती. इतकी शास्त्रशुध्द नगररचना आपल्याला भारतीय इतिहासात पुढे अनेक शतके लोटली तरी आढळत नाही.