जनपदे व महाजनपदे

प्रस्तावना, जनपदे

views

3:24
भारताच्या इतिहासामध्ये साधारण इ.स.पू. १००० ते इ.स.पू. ६०० हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. वैदिकोत्तर म्हणजे वैदिक संस्कृतीनंतरचा कालखंड आणि वैदिकपूर्व म्हणजे वैदिक संस्कृतीपूर्वीचा कालखंड होय. वैदिकोत्तर काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती. जन म्हणजे समान संस्कृतीचे किंवा एका जमातीचे लोक. त्यांनी स्थापन केलेल्या वसाहतींना जनपद म्हणत किंवा जनवस्ती करून राहिलेल्या ठिकाणांना जनपद ही संज्ञा लावण्यात येत असे.. ही जनपदे म्हणजे केवळ भौगोलिक विभाग नव्हते; तर प्रत्येक जनपदातील लोकांचे सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवन स्वतंत्र असे आणि स्वतंत्रपणेच विकसित होत होते. ही जनपदे भारतीय उपखंडाच्या (नकाशावर दाखवणे) वायव्येला असलेल्या आजचा जो अफगाणिस्तान आहे, तिथून ते पूर्वेला बिहार, बंगाल, ओडीसापर्यंत पसरलेली होती. तसेच ती दक्षिणेला महाराष्ट्र राज्यापर्यंत पसरली होती. आपल्या या महाराष्ट्रातील काही भाग हा तेव्हाच्या ‘अश्मक’ या जनपदाने व्यापलेला होता .अश्मक जनपद हे १६ मोठ्या महाजनपदांपैकी एक होते. नर्मदा आणि गोदावरी या नद्यांच्या मध्ये वसलेल्या या प्रदेशाची राजधानी पाटण होती. संस्कृत, पाली, अर्धमागधी या भाषांतील साहित्यांत जनपदांची नावे आढळतात.