प्रकाश व छायानिर्मिती

प्रकाशाचे स्रोत

views

3:18
प्रकाश म्हणजे उजेड आणि छाया म्हणजे सावली. वस्तू दिसण्यासाठी आपल्याला प्रकाशाची गरज असते. प्रकाश व छाया यांचा संबंध अगदी जवळचा आहे. प्रकाशाच्या स्रोताचे दोन प्रकार आहेत: 1) ‘प्रकाशाचे कृत्रिम स्रोत’ आणि 2) प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत ज्या दीप्तीमान वस्तूंची निर्मिती मानवाने केली आहे त्या वस्तूंना ‘प्रकाशाचे कृत्रिम स्रोत’ म्हणतात. ज्या प्रकाशाची निर्मिती नैसर्गिकपणे होते, ती करण्यासाठी मानवाला कोणतेही कष्ट घ्यावे लागत नाहीत, अशा स्रोतांना प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत असे म्हणतात. सूर्य हा प्रकाशाचा सर्वात मुख्य नैसर्गिक स्रोत आहे.