विश्वाचे अंतरंग

प्रस्तावना

views

5:6
आपण आकाशाकडे पहिले तर आपल्याला विस्तीर्ण असा भाग दिसतो. त्याविषयी जाणून घेण्याचे कुतूहल सर्वांनाच वाटते. आकाशात असणाऱ्या गोष्टींचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. आकाशात अनेक तारे दिसतात. निरभ्र व काळोख्या आकाशाचे निरीक्षण केले तर दक्षिणोत्तर पसरलेला तारकांनी भरलेला एक पांढरा धुरकट पट्टा आपल्याला दिसतो. यालाच आपण आकाशगंगा असे म्हणतो. या आकाशगंगेलाच ‘मंदाकिनी’ या नावाने ओळखले जाते. असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका असे म्हणतात. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आपण आकाशगंगा असे म्हणतो.