प्राचीन भारत आणि जग Go Back भारत आणि पश्चिमेकडील देश-भाग 2 views 2:33 भारत आणि पश्चिमेकडील देश (भाग 2 ) :- पहिल्या शतकात रोमन सम्राट ऑगस्टस याच्या काळात भारताचा रोमन साम्राज्याशी व्यापार सुरू झाला. रोमचे साम्राज्य हे भारताचे पश्चिमेकडील सर्वांत मोठे व्यापारी भागीदार होते. इस १३० मध्ये सुरू झालेला व्यापार पुढे वाढतच राहिला. हा व्यापार मुख्यत्वे रोमशी सरळपणे न होता, अरब, इजिप्त या मधल्या व्यापारां मार्फत होत असे. ऑगस्टस या रोमन सम्राटाच्या काळापर्यंत प्रतिवर्षी १२० जहाजे मायोस होर्मोस पासून भारतापर्यंत ये जा करत. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि तामिळनाडूतील अरीकामेडू ही या व्यापाराची केंद्रे होती. कोल्हापूर आणि अरीकामेडू इथे झालेल्या उत्खननात रोमन बनावटीच्या अनेक वस्तू सापडल्या आहेत. त्यावरून या व्यापाराचा पुरावा मिळतो.. इ. सनाच्या पहिल्या व दुसऱ्या शतकात भारत व रोम यांच्यातील सुरु झालेल्या या व्यापारामध्ये दक्षिण भारतातील अनेक बंदरांचा मोठा वाटा होता. या दोन व्यापारी केंद्राप्रमाणे अनेक व्यापारी केंद्रांचा उल्लेख त्यावेळच्या साहित्यात मिळतो.या व्यापारात इजिप्त या देशातील अलेक्झांड्रिया नावाचे बंदर महत्त्वाचे होते. अलेक्झांड्रिया हे इजिप्त देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व सर्वात मोठे बंदर आहे. आणि ते इजिप्तच्या उत्तरेकडील भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. त्यामुळे भारताचा माल अरब व्यापारी या अलेक्झांड्रिया बंदरापर्यंत घेऊन जात. तेथून पुढे तो युरोपातील इतर देशांमध्ये पाठवला जात असे. अरबांनी भारतीय मालाबरोबर भारताचे तत्त्वज्ञान आणि विज्ञान युरोपीय राष्ट्रांपर्यंत पोहचविले. भारत आणि पश्चिमेकडील देश-भाग 1 भारत आणि पश्चिमेकडील देश-भाग 2 भारत आणि आशिया खंडातील इतर देश आग्नेय आशियातील देश