हवेचा दाब Go Back प्रश्न उत्तरे. views 2:52 कमी व जास्त हवादाबाची क्षेत्रे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे जाताना वेगवेगळ्या भागांत आढळतात. पृथ्वीवरील हवेच्या दाबावर अनेक घटक परिणाम करीत असतात. उदा. त्या प्रदेशातील तापमान, हवेतील बाष्पाचे प्रमाण यांसारख्या गोष्टी हवेच्या दाबावर परिणाम करीत असतात. आणि हे सर्व घटक पृथ्वीवर सर्व ठिकाणी समान नसतात. त्यामुळे पृथ्वीवरील हवेचा दाब सर्वत्र सारखा नसतो. हवेमध्ये असणारे धूलिकण, बाष्प, जड वायू यांसारख्या घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत म्हणजे जमिनीलागत जास्त असते. जसजसे आपण भूपृष्ठापासून उंचीवर जाऊ तसतसे या घटकांचे हवेतील प्रमाण कमी होते. म्हणजेच, भूपृष्ठापासून आपण जसजसे उंच जावे, तसतशी हवा विरळ होत जाते. परिणामी हवेचा दाब उंचीनुसार कमी होत जातो. यावरील काही प्रश्न उत्तरांची उजळणी करू. प्रस्तावना प्रदेशाची उंची व हवेचा दाब तापमानाचे पट्टे आणि हवेचे दाबपट्टे यांचा परस्परांशी संबध प्रश्न उत्तरे. भूपृष्ठावरील दाबपटटे उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे हवेच्या दाबाचे परिणाम