घातांक

पाया व घातांक

views

4:53
पाया व घातांक : मुलांनो जर मी प्रत्येक मुलाला 3 चेंडू याप्रमाणे 5 मुलांना चेंडू वाटले. तर मी एकूण किती चेंडू वाटले ? वि: बाई प्रत्येकाला 3 म्हणजे 3 + 3 + 3 + 3 + 3 = 15. म्हणजे एकूण 15 चेंडू वाटले.शि: बरोबर ! इथे तुम्ही चेंडूंची एकूण संख्या काढण्यासाठी एकाच संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज करून ती गुणाकार रूपात मांडली. आता 4 ही संख्या 6 वेळा घेऊन केलेला गुणाकार पाहा: .4 X 4 X 4 X 4 X 4 X 4 म्हणजे येथे 4 चा गुणाकार 6 वेळा केला आहे. याची थोडक्यात मांडणी करण्यासाठी 46 (4चा 6 वा घात) असे लिहितात. 46 ही घातांकित संख्या आहे. म्हणजेच 4 ही संख्या 6 वेळा घेऊन केलेल्या गुणाकाराचे घातांक रूप आहे. यामध्ये खाली असणारी संख्या म्हणजे 4 हा पाया असतो. तर डोक्यावर असणारी संख्या म्हणजे 6 हा घातांक असतो. याचे वाचन ‘ चार चा सहावा घात’ किंवा ‘4 चा घातांक 6’ असा करतात.